श्री पंत महाराज बाळेकुंद्री विरचित "श्री दत्त प्रेमलहरी" ही भजनगाथा सहज उपलब्ध व्हावी व आजच्या नि उद्याच्या पंतभक्ताला ह्या भजनगाथेतील पदांचे कधीही, कोठेही वाचन, श्रवण करिता यावे ह्या हेतूने, श्री पंत महाराजांचा आशिर्वाद घेवून ह्या अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे.
श्री दत्त प्रेमलहरी भजनगाथेमधील सर्व पदें ह्या अॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, हे कार्य सिद्धीस नेण्यास ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही आभार मानू इच्छितो.
श्री पंत बोधपीठ आणि श्री नरसिंह पंत वाङमय प्रकाशन मंडळ ह्यांनी दिलेल्या पाठींब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे हे कार्य लवकर सिद्धीस नेण्यास हाथभार लागला.
सर्व गुरुबंधुंना एक कळकळीची विनंती कि, हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर कृपया आपला अभिप्राय आणि विचार आम्हांस जरूर कळवावेत, त्यासाठी ह्या अॅप्लिकेशनच्या प्रकाशकाशी संपर्क साधावा जेणेकरून हे अॅप्लिकेशन अजून चांगल्या पद्धतीने आपल्या गुरुबंधुंसाठी उपलब्ध करीता येईल, त्यासाठी तुम्ही "shreepantcreations@gmail.com" ह्या इमेल वर संपर्क करू शकता.
श्री पंत समर्थ...श्री गुरुदेव दत्त...!!!
- श्री पंत क्रिएशंस